पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj Kondhwa Road Crime | हातगाडीवर भाजी खरेदी करत असताना महिलेसोबत अश्लील कृत्य (Obscene Acts) करुन विनयभंग केला. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला व तिच्या दाजींना शिवीगाळ करुन मारहाण करुन महिलेच्या कपाळावर लोखंडी कठीण वस्तू मारुन जखमी केले. हा प्रकार गोकुळनगर (Gokul Nagar Pune) भागातील कात्रज-कोंढवा रोडवर गुरुवारी (दि.21) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत 32 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन एका महिलेसह तिचा मुलगा व एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 354, 354(अ), 323,, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भाजीच्या हातगाडीवर भाजी खरेदी करत होत्या. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करुन विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे दाजी याबाबत आरोपीकडे विचारणा करण्यासाठी गेले. (Molestation Case)
आरोपीने व त्याच्या सोबत असलेल्या महिलेने दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुला काय करायचे ते कर असे म्हणून धमकी दिली. ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी यांच्या मुलाने मध्यस्थी केली असता त्याला देखील मारहाण केली. तसेच आरोपी महिलेच्या मुलाने लोखंडी वस्तू फिर्य़ादी यांच्या कपाळावर मारुन जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase) करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग
येरवडा : घराजवळ वाळत टाकलेले कपडे घेण्यासाठी गेलेल्या 13 वर्षाच्या मुलीचा पाठलाग करुन तिच्याकडे मोबाईल नंबरची मागणी केली.
तसेच तिला चॉकलेट देतो असे सांगून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
हा प्रकार येरवडा परिसरात शुक्रवारी (दि.22) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
यावरुन चंद्रशेखर प्रकाशसिंग कुशवाह Chandrasekhar Prakash Singh Kushwaha (वय-32 रा. येरवडा)
याच्यावर आयपीसी 354(ड) सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी (API Prerna Kulkarni) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा