Shivsena UBT On Modi Govt | …तर केजरीवाल अजित पवारांसारखे भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

मुंबई : Shivsena UBT On Modi Govt | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडून भाजपच्या वॉशिंग मशीनशी हातमिळवणी केली असती तर ते अजित पवारांप्रमाणे भाजपचे नवे शंकराचार्य म्हणून नियुक्त झाले असते, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे की, केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबर जाऊ नये यासाठी ईडीच्या माध्यमातून दहशत निर्माण केली गेली. केजरीवाल यांनी भाजपसमोर झुकण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्या सरकारी निवासस्थानात घुसून ईडीने त्यांना अटक केली.

लोकांनी पूर्ण बहुमताने निवडून दिलेली सरकारे पाडता येत नाहीत तेव्हा ईडी वगैरे यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनाच अटक करायची हे धोरण मोदी-शहांच्या सरकारने स्वीकारले आहे. यालाच हुकूमशाही म्हणतात.

आचारसंहिता असताना निवडणुकीत उतरलेल्या सरकारविरोधकांची अशी मुस्कटदाबी करणे हे कसले लक्षण समजायचे? विरोधकांनी निवडणुकीत उतरूच नये यासाठी सुरू असलेला हा दहशतवाद आहे. औरंगजेबी वृत्ती सध्याच्या केंद्रीय राज्यकारभारात दिसत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक धक्कादायक, आश्चर्यकारक नाही. हुकूमशहा डरपोकच असतो.
एक अकेला सब पर भारी असे मोदींविषयी म्हणतात ते खरे नाही. मोदी हे घाबरले आहेत.
त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात.

अरविंद केजरीवाल यांना मद्याच्या ठेक्यांच्या बदल्यात शेकडो कोटींच्या देणग्या स्वीकारल्याप्रकरणी अटक केली असेल,
तर भाजपालाही निवडणूक रोख्यांमधून अशाच प्रकारच्या हजारो कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत.

केजरीवाल हे राजकीय पक्ष चालवतात व त्यांनी मद्याचे ठेके देण्याच्या बदल्यात देणग्या स्वीकारल्या असा ईडीचा आरोप आहे, पण अशा प्रकारे हजारो कोटींच्या देणग्या भाजपच्या खात्यातदेखील जमा झाल्या आहेत.
निवडणूक रोखे घोटाळ्यांनी भाजपचा चेहराच ओरबाडून निघाला.
ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्या त्या कंपन्यांकडून भाजपने जबरी वसुली करून पक्षाला निधी घेतला.

गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा वळवून घेणे यालाच पीएमएलए कायद्यात मनी लाँडरिंग म्हटले जाते.
असे मनी लाँडरिंग भाजपने केले, पण भाजप व त्यांचे वसुली एजंट मोकळे असून केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह
यांना अटका झाली आहे, असे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Poona Gujarati Bandhu Samaj | श्री पूना गुजराती बंधू समाज ची निवडणूक बिनविरोध ! अध्यक्ष पदी नितीनभाई देसाई व मॅनेजिंग ट्रस्टी पदी राजेश शहा यांची फेरनिवड निवड

PM Modi On Moscow Attack | रशियात दहशतवादी हल्ला; 70 ठार, 115 जखमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध

Sharad Pawar Vs Ajit Pawar | पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच होलसेल चोरी, सगळे सोडून गेले, गेले ते गेले! आपण नवीन उभे करू : शरद पवार