Pune Katraj News | लेकटाऊन सोसायटी समोरील तीव्र उतारावरील सिमेंट रस्ता गुळगुळीत झाल्याने धोकादायक

टँकरमधून गळणाऱ्या पाण्यामुळे रस्ता निसरडा होऊन दररोज दोन ते तीन अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj News | कात्रज येथील राजस सोसायटी (Rajas Society) कडून बिबवेवाडी कडे जाणारा लेक टाऊन सोसायटी समोरील तीव्र उताराचा सिमेंट रस्ता गुळगुळीत झाला आहे. या रस्त्यावर पाण्याच्या टँकर मधून पडणाऱ्या पाण्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. विशेषतः लहान आकारमानाचे टायर असलेल्या मोपेड मोठया प्रमाणात घसरत असून महिला चालकांचे प्रमाण अधिक आहे.(Pune Katraj News)

राजस सोसायटी येथून लेकटाऊन मार्गे बिबवेवाडी आणि कात्रज उद्यानाकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रिटचा आहे. अनेक वर्षांपूर्वी तयार केलेला हा रस्ता खड्डे मुक्त असला तरी अत्यंत गुळगुळीत झालेला आहे. रस्त्यावर काही प्रमाणात वाहनांचे ऑईल सांडलेले असते. अशातच पेशवे तलावाजवळील टँकर पॉईंट येथून भरून येणारे आणि बिबवेवाडी कडे जाणारे टँकर चालक याच मार्गाचा वापर करतात. बहुतांश टँकर ची वरील झाकणे उघडीच असतात आणि नळावाटे देखील गळती सुरूच असते. हे पाणी गुळगुळीत रस्त्यावर पडल्यानंतर रस्ते निसरडे होतात आणि त्यावरून उतारावरून येणाऱ्या दुचाकी घसरून पडत आहेत. प्रामुख्याने मोपेड प्रकारातील आणि मोठया प्रमाणावर महिला वापरत असलेल्या मोपेडस चे प्रमाण अधिक आहे. दररोज सकाळच्या वेळेत दोन ते तीन अपघात होतात, असे येथील नागरिकांनी सांगितले. या रस्त्याने जाणारे टँकर बंद करावेत आणि गुळगुळीत झालेले रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित