Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे (Suicide Case). पुण्यातील गुरुवार पेठेत (Guruwar Peth Pune) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास खडक पोलीस (Khakak Police Station) करीत आहेत. (Pune Crime News)

अभिलाषा मित्तल Abhilasha Mittal (वय-27) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. अभिलाषा ही मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे (Washim Girl Suicide In Pune). या घटनेची खडक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा मागील महिन्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती.

अभिलाषाच्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, ती खोलीत एकटीच होती. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करुन गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला, तसेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता अभिलाषाने आत्महत्या केल्याचे दिसले.

या घटनेची माहिती खडक पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.
अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या काही खुणा आढळून आल्याने ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास
पोलीस करत आहेत. पोलिसांनी अभिलाषाच्या नातेवाईक व मैत्रिणींची चौकशी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे : ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : धक्कादायक! सामोस्या मध्ये टाकले निरोध, दगड अन् गुटखा, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपनी मालकासह 5 जणांवर FIR

PM Narendra Modi | आज सायंकाळी PM मोदींची चंद्रपूरमध्ये सभा, आगमनापूर्वी म्हणाले महाराष्ट्रातील जनमानसाने महाप्रण केलाय…