Pune Khadakwasla Dam | धरणक्षेत्रांत पावसाला सुरूवात ! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : Pune Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला हे धरण गुरुवारी सायंकाळनंतर 100 टक्के भरल्याने या धरणातून मुठा नदीत (Mutha River) पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून गुरुवारी रात्री उशीरा देण्यात आली. (Pune Khadakwasla Dam)

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री 11 वाजता पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. हवामान विभागाने पुण्याला मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा दिला आहे. त्यानुसार रविवारपर्यंत धरणांच्या परिसरासह घाटमाथ्यावर आणि शहरातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Pune Khadakwasla Dam)

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या चारही धरणांत मिळून एकूण २९.०८ टीएमसी म्हणजेच ९९.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरण रात्री १०० टक्के भरले. त्यामुळे रात्री ११ वाजता ४२८ क्युसेकने धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. पावसाचे प्रमाण पाहून धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले नसल्याचे जलसंपदा विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले होते.
मात्र, धरणांच्या परिसरात पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले.
परिणामी या धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांसह नदीतही श्रींचे विसर्जन करता येणार आहे.

Web Title :- Pune Khadakwasla Dam | It started raining in the dam area! Water release from Khadakwasla Dam has started

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी आजपासून

Ajit Pawar | ‘नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतात कारण..’ अजित पवारांचा ‘दादा स्टाईल’ बावनकुळेंना टोला

Atul Bhatkhalkar | ‘प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट’, भाजप नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका