Pune Kondhwa Crime | जेवणाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन बलात्कार, कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी नेले. त्याठीकाणी मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले. याबाबत कुणाला सांगितले तर स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कोंढवा परिसरातील कामठे पाटील नगर येथे राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि.8) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन विवेक रामकृष्ण निमकरडे (वय-19 रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर आयपीसी 376, 323, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे. (Pune Rape Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
मुलगी येवलेवाडी येथील कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने तुला माझ्या आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगितले. तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून येवलेवाडी येथील त्याच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने त्याला प्रतिकार केला असता तिला हाताने मारहाण केली. तसेच याबाबत घरी किंवा कोणाला काहीही सांगितले तर मी माझ्याच जीवाचे बरेवाईट करुन घेईल. तुला व तुझ्या घरच्यांना अडकविन अशी धमकी दिली. यानंतर दुचाकीवरुन घरी सोडल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abhishek Ghosalkar | अंगरक्षकाच्या पिस्तुलातून अभिषेकवर गोळीबार ! मेहूल पारेख, रोहित साहू यांना घेतले ताब्यात, आणखी एक पिस्तुल जप्त

FIR On Nikhil Wagle In Pune | पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणारी सराईत गुन्हेगारांची टोळी मुंढवा पोलिसांकडून गजाआड; तलवार, कोयता, लोखंडी रॉड जप्त (Video)

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट