FIR On Nikhil Wagle In Pune | पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह Twit

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – FIR On Nikhil Wagle In Pune | भारतरत्न (Bharat Ratna) व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद Twit केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भाजपचे नेते सुनिल देवधर (वय ५८, रा. नारायण पेठ) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. २६/२४) दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न दिल्याबद्दल सोशल मीडियावर संदेश देऊन अभिनंदन केले होते. त्यावर Twit करताना पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे अडवाणी यांना मानणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून समाजात एकोपा राहण्यास बाधा निर्माण केली. तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. (FIR On Nikhil Wagle In Pune )

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भाजपकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ! आमदार रवींद्र धंगेकर यांचे मत (Video)

शेतकऱ्यांमधील नकारात्मकतेचे विष काढून टाकण्यास मदत करा ! जागतिक अध्यात्मिक आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आवाहन

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट