Pune Kondhwa Crime News | बलात्कार करण्याची धमकी देऊन पतीला शिवीगाळ, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime News | पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणीच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोंढवा परिसरात महिलेला फोन करुन बलात्कार करण्याची धमकी (Rape Threat) दिली. तसेच तिच्या पतीला फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Molestation Case)

याबाबत कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7 जानेवारी) फिर्यादी यांच्या घरात फोनवर घडला आहे. याप्रकरणी दिलीपकुमार वेनाचंद जैन व इतर अनोळखी मोबाईल धारकांवर आयपीसी 354(ड) 504, 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलिसांनी आरोपी दिलीपकुमार जैन याला सीआरपीसी कलम 41(1) नुसार नोटीस दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना कामावर सुट्टी असल्याने त्या कोंढवा येथील त्यांच्या घरी होत्या.
त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपींचे वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन आले.
त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत अश्लील बोलून बलात्कार करण्याची धमकी देऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे
वर्तन केले. तसेच फिर्यादी यांच्या पतीला फोन करुन शिवीगाळ करुन धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prabha Atre Passed Away | पद्मविभूषण स्वयमयी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Lashkar Crime News | पत्रकार असल्याचे सांगुन महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात पैशाची मागणी! भुषण साळवे, संदिप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

Pune Police Inspector Transfer News | पुण्यातील 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंढवा, भारती विद्यापीठ, येरवडा, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश