Pune Kondhwa Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, ऐनवेळी लग्नास नकार; कोंढवा परिसरातील प्रकार, आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | तरुणीला लग्नाचे वचन (Lure Of Marriage) देऊन, आपण लग्न करणार आसल्याचे सांगून तरुणाने मुलीच्या घरी कोणी नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले. तसेच तरुणाच्या आई-वडिलांनी लग्नासाठी दागिने व कपड्यांसाठी खर्च करण्यास भाग पाडले. मात्र, तरुणाने ऐनवेळी लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार 14 डिसेंबर 2023 ते आजपर्य़ंत उंड्री येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) तिघांवर गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली आहे. (Pune Rape Case)

याबाबत उंड्री येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.8) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आदित्य कृष्णन (वय-28), राजेश्वरी कृष्णन (वय-54), पी. कृष्णन (वय-57) यांच्यावर आयपीसी 376/2/एन, 420, 34 सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या (Atrocity Act) कलम 3(2)(5) नुसार गुन्हा दाखल केला असून आदित्य कृष्णन याला अटक केली आहे. (Pune Kondhwa Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आदित्यने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे वचन दिले. आपण लग्न करणार आहोत असे सांगितले. तसेच तरुणीच्या घरात कोणी नसताना तिच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर आरोपीच्या आईने देखील तरुणीला आम्ही तुला स्वीकारले आहे असे वारंवार फोनवर बोलत असताना सांगितले. आरोपींनी लग्नासाठी, दागिन्यासाठी आणि कपड्यांसाठी तरुणीला खर्च करण्यास भाग पाडले. मात्र, आरोपी आदित्य याने ऐनवेळी लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abhishek Ghosalkar | अंगरक्षकाच्या पिस्तुलातून अभिषेकवर गोळीबार ! मेहूल पारेख, रोहित साहू यांना घेतले ताब्यात, आणखी एक पिस्तुल जप्त

FIR On Nikhil Wagle In Pune | पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणारी सराईत गुन्हेगारांची टोळी मुंढवा पोलिसांकडून गजाआड; तलवार, कोयता, लोखंडी रॉड जप्त (Video)

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट