Pune Kondhwa Crime | पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक; कोंढवा भागातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | पत्नीने शारीरिक सबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधम बापाने पाच वर्षाच्या मुलीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) आरोपी बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित मुलीच्या राहत्या घरात घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 26 वर्षीय आईने शुक्रवारी (दि.1) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 26 वर्षीय नराधम बापावर आयपीसी 354, 323, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Kondhwa Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांचा पती असून त्याने दारुच्या नशेत शरीर संबंधाची मागणी केली.
मात्र, फिर्य़ादी यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने त्याच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्याने हाताने मारहाण केली. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर घरातून हाकलून देईल अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.

अश्लील स्पर्श करुन तरुणीचा विनयभंग

पुणे : तरुणीचा राहत्या घरापासून पाठलाग करुन तिच्याकडे मोबाईल नंबरची मागणी केली.
तसेच तु मला आवडते असे म्हणत अश्लील स्पर्श करुन लगट करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला
(Molestation Case). हा प्रकार 25 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान गुलटेकडी येथे वारंवार घडला आहे.
याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद (Swargate Police Station) दिली आहे.
यावरुन अनिकेत जाधव (वय-25 रा. गुलटेकडी, खड्डा महर्षीनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(अ),
506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shikhar Bank Scam Case | अजितदादा सत्तेत इन, तपास आऊट, शिखर बँक घोटाळ्याचा तपास बंद करा; पोलिसांची कोर्टाला विनंती

Dabholkar Murder Case | डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’च्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचे महत्वाचे वक्तव्य, ”आम्हाला अडकवण्याचा…”

Pune Mundhwa Police | दुचाकीस्वाराला भररस्त्यात मारहाण करुन लुटले, दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

BJP-Shivsena Seat Sharing In Lok Sabha Elections | जागावाटपावरून महायुतीत तणाव, शिंदे गटाचा संताप, सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय?

Pune Lonavala Mega Block | पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्यांची यादी