Pune Kothrud Crime | पुणे : घराच्या खिडकीत घुसल्या गोळ्या, ‘डीआरडीओ’च्या फायरिंग रेंजमधून गोळ्या आल्याचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Crime | पुण्यातील कोथरुड येथील भुसारी कॉलनीत ‘डीआरडीओ’च्या (DRDO) शेजारी असलेल्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये बंदुकीमधून झाडलेल्या गोळ्या अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली असून नेमकी काय घडले याबाबत पोलीस तपास करीत आहेत. (Firing In Bhusari Colony)

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड
येथील भुसारी कॉलनीमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार कोथरुड पोलिसांच्या पथकाने तात्काळ त्याठिकाणी धाव घेतली.
या ठिकाणी तपासणी केली असता एका सदनिकेच्या खिडीच्या काचेमध्ये गोळी अडकल्याचे दिसून आले.(Pune Kothrud Crime)

सदनिकेच्या खिडकीत अडकलेली गोळी ‘डीआरडीओ’च्या फायरिंग रेंजमधून आलेली असावी असा अंदाज आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

Wake Up Punekar Campaign | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश – माजी आमदार मोहन जोशी

Ritaa India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या वतीने “वित्तीय गुंतवणूक आणि संधी” कार्यशाळा संपन्न

Maratha Reservation Bill | मोठी बातमी, मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, पण मनोज जरांगेंनी व्यक्त केला संताप

Pune PMC News | देवाची उरूळी कचरा डेपोतील ‘बायोमायनिंग’ प्रकल्प महिन्याभरापासून बंद; निविदा प्रक्रियेच्या ‘घोळा’ मुळे पालिकेला ‘एनजीटी’चा सामना करावा लागणार !

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ”सरकारने मराठा समाजाचा अपमान केलाय”, मनोज जरांगे आक्रमक, उद्या ‘या’ ठिकाणी निर्णायक बैठक