Maratha Reservation Bill | मोठी बातमी, मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, पण मनोज जरांगेंनी व्यक्त केला संताप

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill) विधानसभेत सादर केले. यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक विधान परिषदेत मांडले जाईल. मात्र, या विधेयकावर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारच्या आरक्षणाची आम्ही मागणीच केली नव्हती असे त्यांनी म्हटले आहे. (Maratha Reservation Bill)

आज विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी त्याच्या मंजुरीसाठी होय म्हणून अनुमोदन दिले. नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे विधेयक बहुमतासह संमत करत असल्याची घोषणा केली.

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला विनंती केली की, विरोधी पक्षांची सुद्धा या विधेयकाला मंजूरी असल्याने अध्यक्षांनी बहुमताने न म्हणता एकमताने विधेयक मंजुर झाल्याची घोषणा करावी. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही फडणवीसांच्या विनंतीला अनुमोदन दिले. त्यानुसार, अध्यक्षांनी एकमताने विधेयक मंजुर झाल्याची घोषणा केली.

या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मी मनोज जरांगे पाटलांना सांगेन की मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत हे मराठा आरक्षण दिले आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात गैरसमज आहे तो त्यांनी दूर करावा.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी विधेयकावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आरक्षण पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांची
पोरं मेलीच म्हणून समजा. आमचं हक्काचं सोडून हे दुसरं आरक्षण कुठलं देताय? राज्य सरकारने सगेसोयऱ्यांच्या
बाबतीतला निर्णय घ्यायला पाहिजे होता.

जरांगे पुढे म्हणाले, ज्या मागणीसाठी उठावच नव्हता, ती मागणी मंजूर केली आहे. ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय,
त्यासंदर्भात ते मराठा समाजाची चेष्टा करत आहेत. ही काही आडमुठी भूमिका नाही.
तशी असती तर ६ महिन्यांचा वेळच दिला नसता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Suspended In Pune Pimpri | पुणे (पिंपरी) : पाच लाख खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ‘सगेसोयरे’चा मुद्दा निकाली काढायचा नव्हता, तर अधिवेशनाची गरजच काय? मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जरांगे संतापले

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज महत्वाचा निर्णय, विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार

ACB Trap Case | सहायक फौजदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Asim Sarode On Eknath Shinde | एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे, उद्धव ठाकरेंना पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळेल : असिम सरोदे

पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक