Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती (Baramati Lok Sabha) आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या (Shirur Lok Sabha) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील ११ हजार ८३, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १९ हजार ६५२ आणि खाजगी जागेवरील १ हजार ८१५ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने (Pune District Administration) दिली आहे.

जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने ३३ मावळ लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ९६१, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे २ हजार ५५२,
खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २०७, ३४ पुणे लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ७८५,
सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ४३१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २५७, ३५ बारामती लोकसभा
मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ४८८, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे ५ हजार २८१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २३२ तर ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ८४९, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १० हजार ३८८, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ११९ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.(Pune Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (Pune RDC Jyoti Kadam) यांनी कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक-2024 : शहरातील 85 जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

MNS Raj Thackeray-BJP Amit Shah | राज ठाकरे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत

Pune Koregaon Park Crime | सिगारेट घेण्यावरुन तरुणाला मारहाण, सहा जणांना अटक; कोरेगाव पार्क परिसरातील घटना