Pune Lok Sabha Election 2024 | पुणे: राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची वडगाव शेरी येथे आढावा बैठक संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत (Pune Lok Sabha Election 2024) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील (Vadgaon Sheri Assembly Constituency) सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते, गौरी शंकरदास, आशुतोष पाचपुते, समन्वय अधिकारी गोपाल पाटील तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशासनाने केलेल्या पूर्व तयारीबाबतची माहिती श्री. बारवकर यांनी दिली. विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकाचे यावेळी निरसन करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फत पुणे लोकसभा मतदार संघातील शिवाजीनगर व पर्वती विधानसभा मतदारसंघात सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मतदान प्रक्रीयेबाबत जनजागृती करण्यात आली.

शिवाजीनगर मतदार संघातील औंध आरोग्य कोटी व पर्वती मतदार संघात श्री संत गाडगेबाबा आरोग्य कोटी धनकवडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्त्व सांगून मतदानाची शपथ देण्यात आली. पर्वती विधानसभा मतदार संघ, निवडणूक शाखा, जिल्हा पुरवठा अधिकारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती प्रेरणा रॅलीचे आयोजन करण्यात आले. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे व जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

Pune Mahavitaran News | सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”

Baramati Lok Sabha Election 2024 | स्थलांतरीत कामगारांच्या मतदानासाठी कृतीयोजना तयार करा; बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेचे तिनही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर, रंगली ‘चाय पे चर्चा’, शहराच्या विकासावर मांडले मत (Video)