Pune Lok Sabha Election 2024 | पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ६ जूनपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.(Pune Lok Sabha Election 2024)

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivajirao Adhalrao Patil Join NCP | शिंदे सेना सोडून आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, अजित पवारांनी केले स्वागत, आता कोल्हेंविरूद्ध लढणार

Drunk and Drive Action In Pune | पुणे : 142 तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी गुन्हा दाखल, वाहतूक विभागाची कारवाई

Arrest In Vehicle Theft | दुचाकी चोरट्यांना दिघी पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

Pune Cheating Fraud Case | पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची 57 लाखांची फसवणूक

Pune Lonavala Ragging Case | पुणे : रूममेट मुलींकडून दिव्यांग मुलीची रॅगिंग, त्रास सहन न झाल्याने ‘ब्रेन स्ट्रोक’; लोणावळ्यातील धक्कादायक घटना

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ‘वंचित’साठी दोन-दोन जागा सोडणार?