Shivajirao Adhalrao Patil Join NCP | शिंदे सेना सोडून आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, अजित पवारांनी केले स्वागत, आता कोल्हेंविरूद्ध लढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Shivajirao Adhalrao Patil Join NCP | शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha) उमेदवारी मिळवण्यासाठी ठरल्याप्रमाणे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेना शिंदे गटाचे नेते (Eknath Shinde Shivsena) असलेले आढळराव उमेदवारीसाठी अजित पवार गटात आले असले तरी या प्रवेशापाठीमागे महायुतीत मोठ्या हालचाली झालेल्या आहेत.(Shivajirao Adhalrao Patil Join NCP)

मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे अजित पवार यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. आता शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे येथे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे विरूद्ध अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत रंगणार आहे.

शिरूर मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा तोच सामना होणार असला तरी आता पक्ष बदलले आहेत. आढळराव शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढणार आहेत, तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढतील.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटातील प्रवेश हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
यांच्या संमतीने झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. एकुणच शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार
ठरवताना पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या असल्याची चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची 57 लाखांची फसवणूक

Pune Lonavala Ragging Case | पुणे : रूममेट मुलींकडून दिव्यांग मुलीची रॅगिंग, त्रास सहन न झाल्याने ‘ब्रेन स्ट्रोक’; लोणावळ्यातील धक्कादायक घटना

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ‘वंचित’साठी दोन-दोन जागा सोडणार?