Pune Lonavala Crime | लोणावळ्यात ‘नंगा’नाच सुरूच! अश्‍लील डान्स करून गोंधळ घालणाऱ्या चार महिला नर्तकांसह 10 जणांवर FIR

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonavala Crime | आलिशान बंगल्यात पॉर्न व्हिडिओच्या शुटींगचा (Porn Video Shooting Case) प्रकार ताजा असतानाच आता लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरात एस4 नावाच्या बंगल्यातील प्रांगणात साऊंड सिस्टीमवर चित्रपटातील गाणी मोठ्या आवाजात लावून अश्‍लील डान्स करून गोंधळ घालणाऱ्या चार महिला नर्तकांसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील बंगल्यातील प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावून त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडून अश्लील हावभाव करुन नाच करायला लावत आहेत, अशी माहिती लोणावळा पोलिसांना (Lonavala Police Station) मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी साऊंट सिस्टीमवर गाणी लावून अश्लील हावभाव करुन नाच करत असलेल्या 9 जणांना ताब्यात घेतले. तसेच साऊंड सिस्टीम जप्त केले.

बंगला भाड्याने देताना बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीरपणे कृत्य होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी आणि बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा पोलिसांनी बंगला मालकांना दिला आहे.

लोणावळा शहर आणि परिसरातील भाड्याने दिले जाणाऱ्या बंगल्यांची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामळे ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहेत, त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन आपल्या बंगल्याची माहिती द्यावी, असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : मनि लाँड्रींग प्रकरणात अटक वॉरंट निघाल्याचे सांगून 40 लाखांची फसवणूक