Pune Lonikand Crime | पुणे : जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand Crime | अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने घरात घुसून शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर पंख्याला लटकवण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार वाघोली (Wagholi) परिसरात पीडित मुलीच्या घरात मार्च 2024 पासून वारंवार घडला आहे. (Pune Rape Case)

याबाबत पीडित 17 वर्षाच्या मुलीच्या आईने रविवारी (दि.7) लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station)
फिर्याद दिली आहे. यावरुन संतोष महादेव चौधरी (वय-40 रा. विश्रांतवाडी) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी घरात एकटी असताना आरोपी जबरदस्तीने घरात आला.(Pune Lonikand Crime)

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याबाबत कोणाला सांगितले तर तुला पंख्याला लटकवेल अशी धमकी दिली.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून मुलीने आईला तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वंजारी (API Vanjari) करीत आहेत

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kesnand Theur Road Accident | पुणे : बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक, 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Surya Grahan 2024 | वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज रात्री 9 नंतर

Pimpri Police Raid On The Gold Thai Spa | पिंपरी : ‘द गोल्ड थाई’ स्पा सेंटर मध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींची सुटका (Video)

Pune SPPU Crime | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण, अद्याप गुन्हा दाखल नाही