Pune Lonikand Crime | पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील केसनंद गावच्या हद्दीत 18 फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पती, सासू-सासरे, दीर, ननंद, पतीचा मामा यांच्यावर गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. (Pune Lonikand Crime)

याबाबत 23 वर्षीय विवाहित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पती हनुमंत अंकूश गिरी, सासू सरस्वती अंकूश गिरी, सासरे अंकूश रामभाऊ गिरी (रा. सुलतापूर, जि. बीड), दिर आदित्य अंकूश गिरी, ननंद सुजाता प्रल्हाद भारती, पतीचा मामा शिवाजी भारती (सर्व रा. मु.पो. सोन्ना ता. वडवणी, जि. बीड) यांच्यावर आयपीसी 307, 328, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती हनुमंत गिरी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आरोपी हनुमंत गिरी याच्यासोबत सप्टेंबर 2018 मध्ये लग्न झाले आहे.
महिला तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी मानसिक व शारीरिक त्रास दिला.
तसेच आरोपी पतीने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन महिलेला हाताने मारहाण केली.
तर इतर आरोपींनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास सासरच्या लोकांनी महिलेचे हातपाय पकडले. यानंतर पतीने महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदीर मारण्याचे विषारी औषध पाण्यात मिसळून ते पाणी बळजबरीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ‘सगेसोयरे’चा मुद्दा निकाली काढायचा नव्हता, तर अधिवेशनाची गरजच काय? मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जरांगे संतापले

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज महत्वाचा निर्णय, विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार

ACB Trap Case | सहायक फौजदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात