Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज महत्वाचा निर्णय, विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार

मुंबई : Maratha Reservation | आज विधीमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर महत्वाची चर्चा होणार आहे. तसेच मराठा आरक्षण (Maratha Reservation) विधेयकाला मंजूरी देण्यात येईल. सरकार मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा समाजाला नोकरीसाठी १२ तर शिक्षणासाठी १३ टक्के आरक्षणाची तरतूद केली जाऊ शकते.

आज सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशनाला सुरूवात होईल. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाईल. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झाल्यावर विधेयक मंजूर केले जाईल.

मराठा समाजाला किती टक्के आरक्षणाची तरतूद केली जाईल, हे देखील आजच स्पष्ट होईल. राज्यात करण्यात आलेल्या सर्व्हेनंतर मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता, याच अहवालाच्या आधारे विशेष अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन सरकारने घेतले आहे.

तर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे मात्र ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
जरांगे यांनी राज्यातील मराठा आमदारांना विनंती केली आहे की, सर्व आमदारांनी विशेष अधिवेशनात मराठा समाजास
ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मागणी करावी. सगेसोयरेबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा,
अन्यथा त्यांना मराठाविरोधी समजले जाईल.

मनोज जरांगे यांनी म्हटले की, आम्ही ओबीसीमध्ये आहोत, त्यांना सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल.
अन्यथा २१ फेब्रुवारीची तयारी आम्ही केलेलीच आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका