Pune : कोरोना संकटकाळात रक्तदानाने महाराणा प्रताप जयंती साजरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या कोरोना संकटकाळात रक्ताचा तुटवडा सर्वत्र जाणवतो. याकरिता विविध रुग्णालये, शासकीय अधिकारी रक्तदानाचे आवाहन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजपूत समाजाने वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती आणि कै.सतिश परदेशी स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १२७ रक्तदात्यांनी त्यात सहभाग घेतला. शिबिरात जमा झालेले रक्त संजीवनी ब्लड बँकेकडे सुपूर्द करण्यात आले.

शिबिराचे उदघाटन पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक भान ठेवून महाराणा प्रताप यांची जयंती रक्तदानाचे साजरी केली याबद्दल हिंदू राजपूत समाज, महाराणा प्रताप युवक मंडळ, महिला मंडळ आणि राजपूत परदेशी समाजाचे कौतुक रासने यांनी केली. याप्रसंगी नगरसेवक वनराज आंदेकर, रविंद्र धंगेकर, प्रविण परदेशी, अ‍ॅड.प्रताप परदेशी, राजू परदेशी, युवराज काची, राम बांगड, किशोर राजपूत, प्रेमसिंग राठोड, अमित चव्हाण, बाबा धुमाळ, सुनंदाताई गडाळे, प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते.

सर्व शासकीय नियम पाळून जयंती साजरी केली. रक्तदानाची संकल्पना यशस्वी होण्यासाठी राजपूत समाजाच्या अनेक मान्यवरांनी गेले महिनाभर विविध तरुणांशी संपर्क साधून त्यांना रक्तदानासाठी उद्युक्त केले. शिस्तबद्ध पद्धतीने शिबीर यशस्वी केले, अशी माहिती राजपूत समाजाच्या वतीने राजेंद्र परदेशी यांनी दिली.