Pune Mahavitaran News | महावितरणच्या उत्कृष्ट 56 जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव ! सेवेचा समृद्ध वारसा जोपासण्याचे ध्येय ठेवा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

पुणे : Pune Mahavitaran News | ‘महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रासोबतच सेवेचाही समृद्ध व संपन्न वारसा आहे. मूलभूत गरज बनलेल्या वीज क्षेत्रात सेवा देताना आपल्या राज्याचा हा वारसा जोपासण्याचे ध्येय ठेवा. मासिक वेतन घेऊन सेवा देण्याचे भाग्य वीज अभियंता व कर्मचारी म्हणून आपल्याला लाभले आहे. त्यासाठी प्रत्येक वीजग्राहकाचे समाधान हे महावितरणचे ध्येय कायम जोपासत राहा’, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार (Chief Engineer Rajendra Pawar) यांनी सोमवारी (दि. १) केले. (Pune Mahavitaran News)

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सन २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या उत्कृष्ट १३ यंत्रचालक व ४३ तांत्रिक कर्मचाऱ्यांना (Janmitra) महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) व कामगार दिनानिमित्त (Kamgar Din) स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता राजेंद्र पवार बोलत होते. यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता सतीश गायकवाड, जयवंत कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांची उपस्थिती होती. (Pune Mahavitaran News)

पुणे परिमंडलातील विभागनिहाय उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे– अनिल जाधव, पुरूषोत्तम झिंगरे, सुशिला कड, अमोल पाटील (बंडगार्डन विभाग), जनार्दन गायकवाड, योगेश बांदल, राहुल इंगळे, योगेश पवार (नगररोड विभाग), सागर कांबळे, दत्ता कांबळे, बाळासाहेब सांडभोर, चंद्रकांत बागवले (पदमावती विभाग), सचिन झांबरे, रोशन ढोबळे, सफल अताग्रे, मोहन दारवटकर (पर्वती विभाग), दत्तात्रय वाल्हेकर, सुरेश एजगर, योगेश वानेरे, समाधान मोरे, निरंजन ठणठणकार (रास्तापेठ विभाग), शरद डगळे, दत्तात्रय हुले, संतराम बनसोडे, अविनाश चौगुले, श्यामकुमार नेवारे, सचिन चिंचोलीकर (मंचर विभाग), स्वप्नील अवचट, गणेश लोखंडे, अमोल कोंडे, सूर्यकांत शिंदे, शरद वाघमारे, पुनाजी चौरे (मुळशी विभाग), धनाजी काळे, ज्ञानेश्वर होले, अमर कोंढाळकर, अजित दजगुडे, हरिदास आंबेकर, सुरेश कोकणे (राजगुरूनगर विभाग), संतोष कांबळे, काळू मोहरे, तुळशीराम गवळी, गुलाब पठाण (भोसरी विभाग), चंद्रशेखर बधे, नीलेश निंबाळकर, पांडुरंग भोसले, बंडू खर्जुले (कोथरूड विभाग), दिनेश कारंडे, हरीश मानकर, अशोक मुळे, काशिनाथ वाजे (पिंपरी विभाग), महादू ठाकरे, सचिन मुंडे, शेषनारायण फावडे, गणेश सेलूकर व हणमंत शिंगटे (शिवाजीनगर विभाग).

Web Title :- Pune Mahavitaran News | Honoring 56 outstanding Janamitras of Mahavitaran with their families! Aim to nurture the rich heritage of service – Chief Engineer Rajendra Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | महाराजांच्या हस्ते ‘चौक’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च ! श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली ‘चौक’च्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

Pune Cyber Crime News | टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक