Pune Mahavitaran News | इंटरनेट केबलमुळे महापारेषणच्या टॉवर लाईनमध्ये बिघाड ! पुणे शहरात काही ठिकाणी तासभर वीजपुरवठा विस्कळीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Mahavitaran News | धायरीमधील आनंदविहार येथे महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीला गुरूवारी (दि. २८) दुपारी १.५३ वाजता इंटरनेट केबलचा स्पर्श झाल्याने नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे विजेची तूट भरून काढण्यासाठी महापारेषणची स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (Load Trimming Scheme- LTS) कार्यान्वित झाली. परिणामी पुणे शहरातील वडगाव धायरी, नऱ्हे, हिंगणे, कोथरूड, जुनी सांगवी, पद्मावती, धनकवडी, कात्रज, आंबेगाव आदी परिसरातील सुमारे ३ लाख ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित झाला होता.(Pune Mahavitaran News)

याबाबत माहिती अशी की, आनंदविहार येथे इंटरनेट केबल टाकण्याच्या प्रयत्न सुरु होता. त्याच ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीला आज दुपारी १.५३ वाजता या इंटरनेट केबलचा स्पर्श झाला. त्यामुळे मोठा आवाज होऊन वीजवाहिनीद्वारे होणारा नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित झाला. यात सुमारे ६० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाल्यामुळे भारव्यवस्थापनासाठी महापारेषणची स्वयंचलित एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे पर्वती २२० केव्ही, नांदेड सिटी २२० केव्ही, कोंढवा (येवलेवाडी) २२० केव्ही तसेच कोथरूड १३२ केव्ही व एनसीएल १३२ केव्ही या अतिउच्चदाब उपकेंद्रातून भारव्यवस्थापन करण्यात आले.

महापारेषणच्या या पाचही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांतील भारव्यवस्थापनामुळे महावितरणच्या विविध उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी वडगाव, धायरी, नऱ्हे, किरकीटवाडी, सिंहगड रस्ता, सनसिटी रस्ता, हिंगणे, पद्मावती, मार्केटयार्ड, कात्रज, आंबेगाव, धनकवडी, जुनी सांगवी, शितोळेनगर, आनंदनगर, एरंडवणे, डहाणूकर कॉलनी या परिसरातील सुमारे ३ लाख ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १.५३ खंडित झाला. महापारेषणच्या अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने आनंदविहार येथे जाऊन अतिउच्चदाब वीजवाहिनीतील बिघाड दुरूस्त केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व परिसरातील वीजपुरवठा दुपारी २.५६ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Sanjay Raut | संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात?, सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला, माझ्याविरोधात…, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Dilip Walse Patil | मंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडले, हात फ्रॅक्चर, पाय आणि पाठीलाही दुखापत

Pune Crime Branch | होळीच्या दिवशी एफसी रोडवरील नागरिकांवर फुगे मारणारे 2 हुल्लबाज गजाआड; 2 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल (Videos)