Pune Market Yard Crime | पुणे : शाळकरी मुलीचा पाठलाग, भररस्त्यात अडवून गैरवर्तन

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Market Yard Crime | शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कॉलेज, ट्युशनला जाणाऱ्या मुलींना भररस्त्यात अडवून त्यांच्यासोबत गैरवर्तन (Obscene Act) करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशीच एक घटना मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या (Market Yard Police Station) हद्दीत घडली आहे. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला 35 वर्षाच्या व्यक्तीने भररस्त्यात अडवून तिचा शाळेचा गणवेश फाडून गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.21) सकाळी साडे अकराच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील एका सोसायटीजवळ घडला आहे. (Pune Market Yard Crime)

याबाबत पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शंकर मोहन पुटगे
(वय-35 रा. मार्केट यार्ड, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), पोक्सो अॅक्ट कलम 11 व 12 नुसार गुन्हा दाखल
केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी गुरुवारी सकाळी साडे अकराच्या
सुमारास रस्त्याने पायी शाळेत जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला.

ADV

आरोपी शंकर याने मुलीच्या पाठीवर असलेली स्कूल बॅक ओढून तिला जवळ ओढले.
त्यावेळी मुलीने त्याला ढकलले असता तिच्या अंगावरील गणवेश फाटल्याने तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली.
आरोपीने तिचा हात पकडून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, तुझ्यासोबत मैत्री करायची आहे असे म्हटले.
मुलीने आरोपीचा हात झटकला असता शंकर याने मुलीला फिरायाला जाऊन असे म्हणत गैरवर्तन केले.
तसेच याबाबत कोणाला काही सांगू नको असे म्हणून आरोपी तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | पुणेकर आता फसणार नाहीत तर जिंकणार आहेत; काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भावना, उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव (Video)

MPSC Exam Postponed | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल व 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

Pune Police News | पुणे: खाजगी वाहनाला पोलीस वाहनासारखी रंगरंगोटी करुन शासकीय कामासाठी वापर केला जात असल्याचा आरोप, माहिती अधिकारात पोलिसांचा ‘प्रताप’ उघड; संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

Pimpri Murder Case | पिंपरी : मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन बेदम मारहाण करुन खून