Pune Military Engineering College | पुण्‍याच्या लष्‍करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने नौकानयन मोहीम

पोलीसनामा ऑनलाइन – Pune Military Engineering College | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लष्‍करी अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांकडून ‘ब्लू वॉटर सेलिंग’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. एचबीटीसी मार्वे ते आयएनएस मांडवी- गोवा आणि पुन्‍हा नौका परत आणणे असे एकूण 570 सागरी मैल अंतर कापणारी ही मोहीम आयोजित केली आहे. यामध्‍ये तीनही सेवांचा संयुक्त सहभाग आहे. तसेच सशस्त्र दलांमध्ये साहसी मोहिमांना प्रोत्साहन देण्‍यासाठी या नौकानयन मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले आहे. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 12 तरुण आणि उत्साही लष्करी अधिका-यांना कठोर प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची निवडी या मोहिमेसाठी करण्‍यात आली आहे. (Pune Military Engineering College)

या नौकानयन मोहिमेत कॅप्टन विवेक कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘ओशिन’ आणि कॅप्टन रोहितसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ‘जलाश्व’ या दोन सीबर्ड क्लास बोटींसह सहभागी होत आहेत. सीबर्ड क्लास सेलबोटची रचना 1922 मध्ये स्कॉटिश नौका डिझायनर अल्फ्रेड मायलने यांनी केली होती. या बोटीमध्‍ये 26 फूट लांब लाकडी डोलकाठी, 6.5 फूट तुळई- दांडी असून बोटीचे क्षेत्रफळ 260 चौरस फूट आहे.

अधिकाऱ्यांनी आर्मी अॅडव्हेंचर नोडल सेंटर, एचबीटीसी मार्वे येथे ब्लू वॉटर सेलिंगचे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण
पूर्ण केले आहे. या अभ्‍यासक्रमामध्ये हवामानाचा अंदाज, ‘ऑफशोअर नेव्हिगेशन’ , समुद्रातील सुरक्षितता,
हवामान एकदम बदल्‍यास वापरावयाच्या युक्ती, पाल दुरुस्ती, बोटीची देखभाल, तरतूद आणि संपर्क प्रणाली
या विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, संघांना 19 एप्रिल 2023 रोजी
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी आयएनएस मांडवीच्या प्रवासासाठी रवाना करण्‍यात आले.
नौकानयन मोहिमेला लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ऑफिशिएटिंग कमांडंट मेजर जनरल विनायक सैनी
यांनी हिरवा झेंडा दाखवला.

Web Title :-  Pune Military Engineering College | Sailing expedition on behalf of Military Engineering College, Pune
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो’, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Crime News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरला जामीन मंजूर