Pune MSEB News | … म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरणच्या बंडगार्डन विभाग MSEDCL Bundgarden Division अंतर्गत नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचे अजस्त्र पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बोट क्लब रोड, वाडिया कॉलेज, ढोले पाटील रोड, ताडिवाला रोड, बंडगार्डन रोड Pune MSEB News आदी परिसरातील सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणच्या नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे अत्यावश्यक झाले आहे.
नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे काम शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
त्यासाठी या उपकेंद्रातील सहा पैकी पाच 22/11 केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
तर नायडू हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटलचा Pune MSEB News वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी उर्वरित एका उच्चदाब वाहिनीचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु ठेवण्यात येणार आहे.
सध्या वर्क फ्रॉम होमसह work from home संचारबंदीनंतर आयटी कंपन्या,
खासगी व सरकारी कार्यालये सुरु झाल्यामुळे तसेच ऑनलाईन परीक्षा Online exam सुरु असल्यामुळे गुरुवारऐवजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी शनिवारी पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे काम करण्यात येत आहे.

नायडू उपकेंद्रांतील पूर्वनियोजित कामामुळे सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद राहणार आहे.
यासंदर्भात महावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलधारक संबंधीत वीजग्राहकांना ‘एमएसएम’द्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे.
बंडगार्डन रोड, बोट क्लब रोड, राजगुरु चौक, भाजी मार्केट, ताडिवाला रोड,
नारंगी बाग रोड, बोट क्लब सोसायटी, कपिला टॉवर, ढोले पाटील रोड, टाटा मॅनेजमेंट एरिया,
अतूर पार्क, नायर रोड, मंगलदास रोड, वाडिया कॉलेज रोड,
नठाण रोड, सिटी पॉईंट, सिटी टॉवर, माणिकचंद ऑयकॉन एरिया, साई राधे कॉम्प्लेक्स,
आरबीएम मिल आदी परिसरासह सेवेज प्लांटचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’