Pune-Mumbai Expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी मंगळवारी ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मंगळवारी (दि. २३ जानेवारी २०२४) दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (Highway Traffic Management System) अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी २४.२५० व पुणे वाहिनीवर कि.मी ५६.९०० (कुसगाव वाडी) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने या कालावधीत वाहतूक वळविण्यात आली आहे. (Pune-Mumbai Expressway)

वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग

  • पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी ५५.००० वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून मार्गस्थ होतील.
  • पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि .मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.
  • पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड -अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट कि.मी ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.
  • मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून पुणे बाजुकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील.
  • मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किलोमीटर ५४.९०० येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून पुणे बाजूकडे वळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप – माजी आमदार मोहन जोशी

Pune ACB Trap Case | पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक 40 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात