Pune Mundhwa Crime | लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, मुंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Crime | सोसायटीच्या लिफ्टमधून घरी जात असताना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.25) सायंकाळी सहाच्या सुमारास घोरपडी येथे घडला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.(Pune Mundhwa Crime)

याबाबत 17 वर्षाच्या मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शाहीद जाकीर शेख Shaheed Zakir Shaikh (वय-20 रा. घोरपडी) याच्यावर आयपीसी 354, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आजीला खाद्य देऊन घरी जात होती. सोसायटीच्या लिफ्टने घरी जात असताना लिफ्टमध्ये आरोपी शाहीद आला. त्याने मुलीला अश्लील स्पर्श करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंगळवारी तिला फोन करुन अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

फिरायला गेलेल्या मुलीसोबत गैरवर्तन

पुणे : मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणीला दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी तरुणाने अश्लील बोलून विनयभंग केला. तसेच पुन्हा पाठिमागून येऊन अश्लील स्पर्श करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार सोमवारी (दि.25) रात्री पावणे बाराच्या सुमारास कोरेगाव पार्क (Koregaon Park Police Station) लेन 2 च्या रोडवर घडला आहे. याबाबत 23 वर्षाच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha Election 2024 | शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे ‘नाईलाजास्तव’ लादलेले उमेदवार ! अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागतो हे शरद पवार यांचे नेतृत्व सिद्ध करते – डॉ. अमोल कोल्हे

Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

Sanjay Raut On Mahayuti | महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल, गुलाम, मांडलिक, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, वंचितबाबत म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट? धंगेकर-मोहोळ यांच्या समोर वसंत मोरे ठरू शकतात मोठे आव्हान, कारण…

Pune Crime Branch | केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई (Video)