Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Shivsena UBT Loksabha Candidates | शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil), तर ठाण्यातून राजन विचारे (Rajan Vichare) यांना उमेदवारी दिली आहे.(Shivsena UBT Loksabha Candidates)

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून अनिल देसाई (Anil Desai) यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. तर पुण्याच्या मावळमधून संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांना तिकिट मिळाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी

बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे
सांगली – चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश आष्टीकर पाटील
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशीव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक – राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई वायव्य – अमोल किर्तीकर
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
परभणी – संजय जाधव

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे, असे या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivajirao Adhalrao Patil Join NCP | शिंदे सेना सोडून आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, अजित पवारांनी केले स्वागत, आता कोल्हेंविरूद्ध लढणार

Drunk and Drive Action In Pune | पुणे : 142 तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी गुन्हा दाखल, वाहतूक विभागाची कारवाई

Arrest In Vehicle Theft | दुचाकी चोरट्यांना दिघी पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू