Pune Municipal Corporation | भौगोलिकदृष्टया राज्यातील सर्वात मोठी ‘मनपा’ बनली पुणे महानगरपालिका; हद्द 485 चौ.कि.मी.पेक्षा मोठी होणार

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज 23 गावे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याने पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) हद्द 485 चौ.कि.मी. झाली असून पुणे महापालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे. Pune Municipal Corporation | Geographically, Pune Municipal Corporation became the largest ‘Municipal Corporation’ in the state; The boundary will be larger than 485 sq. Km

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हद्दीवरील 34 गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यासंदर्भात 18 डिसेंबर 2013 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय होउन प्रस्ताव राज्य शासनाकडे (State Government) पाठविण्यात आला होता. दरम्यान मे मध्ये राज्यात सत्ता बदल झाला. गावे समाविष्ट करण्यासंदर्भात या गावांमधील नागरिकांनी स्थापन केलेल्या कृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी राज्य शासनाने (State Government) विहीत मुदतीत टप्प्याटप्प्याने गावे समाविष्ट करण्यात येतील, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात (Court) दिले होते. त्यानुसार 2017 मध्ये 11 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. तेथे निवडणुकही घेण्यात आली असून पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation) या गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर उर्वरीत २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने २३ डिसेंबर २०२० ला अधिसूचना प्रसिद्ध केली होती. गावे समाविष्ट करताना राज्य शासनाने या गावातील विकासासाठी निधी द्यावा. तसेच या गावांमध्ये पीएमआरडीएच्यावतीने (PMRDA) देण्यास आलेल्या विकास परवानग्यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून काही हिस्सा या गावातील विकासकामांसाठी द्यावा, अशी मागणीही महापालिकेने शासनाकडे केली आहे. दरम्यान विभागीय आयुक्तांनी गावे समाविष्ट करण्यासंदर्भात मागविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर मागील महिन्यांत सुनावणी घेउन अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार गावे समाविष्ट करण्याचा आज आदेश काढण्यात आला.

 

गावांची सद्यस्थिती व महापालिकेपुढील आव्हाने

–  महापालिकेच्या हद्दीलगत असल्याने मोठ्या प्रमाणात अनियंत्रीत विकास झाला असून लोकसंख्या वाढली आहे.

–  रस्ते, पाणी पुरवठा, घनकचरा, आरोग्य आणि ड्रेनेज या प्राथमिक गरजांवर तातडीने काम करण्याची नागरिकांची अपेक्षा. पाटबंधारे विभागाकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा वाढवून घ्यावा लागणार.

–  ही गावे पीएमआरडीएच्या हद्दीत असल्याने पीएमआरडीए कडून विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात.

–  विकास आराखड्यात पिढ्यानपिढ्या जोपासलेल्या शेत जमिनीवर आरक्षणाची भिती.

–  महापालिकेत आल्यानंतर मिळकतकर वाढणार असल्याने 11 गावांप्रमाणेच 23 गावांतूनही विरोधाची शक्यता.

–  भौगोलिक हद्द वाढल्याने दैनंदीन व्यवस्थापनासाठी महापालिकेला मनुष्यबळ वाढीवर भर द्यावा लागणार.

 

समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांची नावे खालील प्रमाणे –

म्हाळुंगे (Mahalunge)

सूस (Sus)

बावधन बुद्रुक (Bavadhan Budruk)

किरकिटवाडी (Kirkitwadi)

पिसोळी (Pisoli)

कोंढवे – धावडे (Kondhve – Dhavade)

कोपरे (Corners)

नांदेड (Nanded)

खडकवासला (Khadakwasla)

मांजरी बुद्रुक (Manjari Budruk)

नऱ्हे (Narhe)

होळकरवाडी (Holkarwadi)

औताडे-हांडेवाडी (Autade-Handewadi)

वडाची वाडी (Vadachi Wadi)

शेवाळेवाडी (Shewalewadi)

नांदोशी (Nandoshi)

सणसनगर (Sanasnagar)

मांगडेवाडी (Mangdewadi)

भिलारेवाडी (Bhilarewadi)

गुजर निंबाळकरवाडी (Gujar Nimbalkarwadi)

जांभुळवाडी (Jambhulwadi)

कोलेवाडी (Kolewadi)

वाघोली (Wagholi)

Web Title : Pune Municipal Corporation | Geographically, Pune Municipal Corporation became the largest ‘Municipal Corporation’ in the state; The boundary will be larger than 485 sq. Km

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Municipal Corporation | अखेर ‘या’ 23 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी