pune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ ! काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  मनुष्यबळ वापराचे सुयोग्य व्यवस्थापन आणि काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी महापालिका (pune municipal corporation) प्रशासनाने पावले उचलली आहेत. यासाठी अधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर करण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावर वापरही सुरू करण्यात आला आहे. महापालिकेचे (pune municipal corporation) सुमारे १८ हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. वर्ग १ ते ३ च्या कर्मचार्यांपेक्षा वर्ग चार अर्थात प्रत्यक्षात फिल्डवर सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या प्रचंड मोठी आहे. यामध्ये पालिकेच्या सेवेतील कायम सेवकांसोबतच ठेकेदारकडील सेवकांची संख्याही मोठी आहे. pune municipal corporation | Municipal Corporation will do ‘tracking’ of employees during duty hours! Attempts to discipline work errors

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

यामध्ये सफाई सेवक, पाणी पुरवठा, वाहन चालक यासह विविध विभागात काम करणार्‍यांचा समावेश.
दैनंदिन कामात एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन करणे आणि फीडबॅक घेणे तसे जिकरीचेच काम आहे.
मात्र, मोठयाप्रमाणावर मनुष्यबळ असले तरी दैनंदिन कामातील तक्रारिंचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

pune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून ! प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू

यापार्श्वभूमीवर प्रशासनाने आहे त्या मनुष्यबळाचा सुनियोजित वापर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचे निश्चित केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक कर्मचार्‍याचे ट्रॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत प्रत्येक कर्मचार्‍याच्या मनगटावर जीपीएस सारख्या प्रणालीचा वापर करण्यात आलेला बँड बांधण्यात येणार आहे.
ड्युटीवर असताना हा बँड वापरणे बंधनकारक राहणार आहे.
कर्मचारी नेमका कुठे काम करत आहे, अथवा कोठे गेला आहे याची माहिती यासाठी सुरू करण्यात कंट्रोल रूम मध्ये बसून मिळणार आहे.
यापुर्वी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला होता.
मात्र तांत्रिक अडचणी अंमलबजावणी होऊ शकली न्हवती.
मागील काही वर्षात तंत्रज्ञान बदलले आहे, त्यामुळे अडचणी येणार नाहीत, असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.

कर्मचारी ड्युटीवर असताना कुठे काम करत आहे, याची माहिती बसल्याठिकाणी समजावी तसेच कार्यक्षमता वाढावी यासाठी आधुनिक डिव्हाईस असलेला रिस्ट बँड प्रत्येक कर्मचार्‍याला देण्यात येणार आहे.
जीपीएस प्रणालीप्रमाणे बसल्याठिकाणी संगणकावर याची माहिती मिळणार आहे.
प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर नियमित अंमलबजावणी करण्यात येईल.

– विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त

 

Web Title : pune municipal corporation | Municipal Corporation will do ‘tracking’ of employees during duty hours! Attempts to discipline work errors

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय