Pune Municipal Corporation (PMC) | थकीत पाणी बिलावर मनपा आकारणार दंडात्मक व्याज, मीटर बिल भरण्यासाठी 60 दिवसांची मुदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यावसायिक व काही निवासी ग्राहकांकडून मीटरद्वारे बिलाची आकारणी करण्यात येत आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment Board) क्षेत्रातील सर्व ग्राहकांना पाण्याच्या वापरानुसार मीटरद्वारे बिल आकारणी (Water Meter Bill) करुन पाणी पुरवठा केला जातो. पाण्याच्या थकीत बिलावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारणी करण्यात येत नसल्याने मोठ्या प्रमाणात बिलाच्या रक्कमेची थकबाकी वाढत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने थकीत बिलावर व्याज आकरण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

मीटर बिलाच्या दिनांकापासून साठ दिवसात बिल न भरल्यास पुणे महानगरपालिकेने
(Pune Municipal Corporation (PMC) थकबाकी रकमेवर प्रतिमाह 1 टक्का दराने दंडात्मक व्याज (Penal Interest) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नव्याने घेण्यात आल्याने 31 जानेवारी 2024 रोजीची थकबाकी भरण्यासाठी 31 मार्च 2024 अखेर 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 1 एप्रिल 2024 पासून थकबाकी रकमेवर व त्यानंतरच्या कोणत्याही थकित रकमेवर 1 टक्का प्रतिमाह दंडात्मक व्याज आकारले जाणार आहे.

मीटरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व ग्राहकांना बिले पुणे महानगरपालिकेकडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र, ग्राहकांना बिले न मिळाल्यास त्यांचे 1 जानेवारी 2024 पर्यंतचे पाण्याचे मीटर बिल लष्कर पाणीपुरवठा विभाग,
स्वारगेट पाणीपुरवठा विभाग, एसएनडीटी-चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभाग येथून प्राप्त करुन घेऊन 31 मार्च 2024
पूर्वी थकबाकीची रक्कम भरावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप
(Chief Engineer Nandkishore Jagtap) यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक