Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेमध्ये तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असताना राज्य सरकारने अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांची नियुक्ती केली आहे. पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) अतिरक्त आयुक्त विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्ती मिळावी, याकरिता अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती.

पुणे महापालिकेच्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, राज्य शासनाने भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली. याबाबतचे आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी शुक्रवारी (दि.2) काढले आहेत.

विकास ढाकणे यांनी प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.
मात्र, शासनास आवश्यक वाटले तर त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांना परत
बोलावले जाणार असून, याबाबतचे अधिकार राज्य सरकारने राखून ठेवल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा