पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना हटवलं ! विक्रम कुमार नवे आयुक्त, पुण्यातील 5 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या काही अधिकार्‍यांच्या यापुर्वी राज्य सरकारनं बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये मुंबईसह इतर काही ठिकाणच्या महापालिका आयुक्तांचा समावेश आहे. दरम्यान, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची आज (शनिवार) अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पीएमआरडीएचे प्रमुख आणि कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरव राव यांची पुण्याच्या विभागीय आयुक्तालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. म्हणजेच सौरव राव यांची विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

senior corporators

शेखर गायकवाड यांची अखेर उचलबांगडी झाली असून त्यांनी पुन्हा साखर आयुक्त म्हणुन पुण्यातच बदली करण्यात आली आहे. कृषी आयुक्त सुहास दिवासे यांची पीएमआरडीएचे प्रमुख तसेच कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र दौडी यांची सांगली येथील जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like