Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, एका तरुणाचा मृत्यू

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | विरुद्ध दिशेने बुलेट दुचाकीवरुन भरधाव वेगात येणाऱ्या वाहन चालकाची समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.30) रात्री साडेबारा वाजता नऱ्हे येथील नवले पुलाकडून वडगाव पुलाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील श्री मंगलम ग्रेनाईट समोर झाला.(Pune Navale Bridge Accident)

पार्थ गिरिष शहा (वय-22 रा. माणिक चौक, कसबा पेठ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर बुलेटवरील (एमएच 12 एस आर 5151) चालक लकी विजय रजपुत (वय-26 रा. धायरी, पुणे) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आयपीसी 279, 304(अ), 338, 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक नेताजी तानाजी कांबळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पार्थ शहा त्याच्या दुचाकीवरुन (एमएच 12 एचएच 5011) नवले पुलाकडून
सर्विस रोडने वडगाव पुलाकडे जात होता. त्यावेळी आरोपी लकी रजपुत हा त्याच्या ताब्यातील बुलेट दुचाकी
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व बेदरकारपणे चालवून विरुद्ध दिशेने आला.
दुचाकी भरधाव वेगात असल्याने त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पार्थ शहा याच्या दुचाकीला समोरून जोरात धडक बसली.
यामध्ये पार्थ गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
तर लकी रजपुत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादातून मित्रावर कोयत्याने वार, पांडवनगर परिसरातील घटना