Pune News : कोंढव्यातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकास 25 हजाराचा गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचे एटीएम आदलाबदली करत त्यातून 25 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 79 वर्षीय जेष्ठ नागरिकांने तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा बुद्रुक येथे राहण्यास आहेत. दरम्यान त्यांना पैश्यांची आवश्यकक्ता होती. त्यामुळे ते दुपारी सोमजी चौकात असलेल्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेले होते. यावेळी फिर्यादी गेल्यानंतर त्याठिकाणी आणखी एकजण होता. त्याने फिर्यादी यांना पैसे मी काढून देतो असे म्हणत त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. यावेळी त्याने फिर्यादी यांच्या नकळत त्यांच्या कडील एटीएम कार्ड घेतले. तसेच हात चालकीने त्यांच्या खात्यावतून 25 हजार काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे संमजताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. यावेळी पोलिसांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.