Pune News : भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका पादचारी जेष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. कोथरूड डेपो (Kothrud depot accident)  परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. शारदाबाई पंडित कांबळे (वय 63) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदाबाई कांबळे या मागील अनेक वर्षापासून भुसारी कॉलनी मध्ये पाच घरी घरकाम करत होत्या. नेहमीप्रमाणेच हा काम आटोपून त्या घरी निघाल्या असताना रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची त्यांना धडक बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शरदाबाई यांच्यामागे पती, दोन मुले, मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

अपघात झाल्यामुळे कोथरूड डेपो परिसरात काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळाल्यानंतर कोथरुड पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडवत परिस्थिती नियंत्रणात आणली. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.