Pune News | अभिनव रात्रशाळा… ऐतिहासिक वारसा आणि वर्तमानाचे भान

Pune News | 1 जानेवारी 2023 हा न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे 30 या शाळेचा एकशे चव्वेचाळीसावा वर्धापनदिन! लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, महादेव नामजोशी या महान संस्थापकांनी स्थापन केलेली शाळा. (Pune News)

या शाळेची स्थापना करण्यापूर्वी एक दिवस हे सर्व महान संस्थापक पूर्वतयारी करण्यासाठी शाळेत मुक्कामास होते.

त्या महान संस्थापकांच्या या शाळेतील मुक्कामाच्या संस्मरणीय दिवसाच्या स्मृती जागवण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. विनायक रामदासी यांनी रात्रशाळेचे आयोजन केले. एकशे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एकशे चव्वेचाळीस विद्यार्थी या रात्रशाळेस उपस्थित होते.

आकाशदर्शन, तारांगण दर्शन, दुर्बिणीतून चंद्रदर्शन, रंजक स्पर्धा, सामूहिक भोजन, गटकार्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या रात्रशाळेत करण्यात आले.

या रात्रशाळेस शाळेतील शिक्षक विकास पढेर, देविदास झोडगे यांनी रंजक स्पर्धांचे आणि गटकार्याचे आयोजन केले होते. विनायक रामदासी यांनी आकाशदर्शनाच्या आणि तारांगण दर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. मुख्याध्यापिका श्रीमती दर्शना कोरके, उपमुख्याध्यापक सुधीर विसापुरे आणि पर्यवेक्षिका श्रीमती अनिता भोसले यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

Web Title :- Pune News | Abhinav Ratrashala… a sense of historical heritage and present

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | सिंहगड कॅम्पसमध्ये कोयत्याने दहशत माजवणार्‍या म्होरक्याला अटक

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध