Pune News : दत्तवाडी, कोंढवा अन् चतुःश्रृंगी परिसरात घरफोडया

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातल्या घरफोड्यांचा धुमाकूळ मात्र काही केल्या थांबत नसून, चोरटे सुसाट अन पोलीस कोमात अशी म्हणण्याची वेळ आली असून, वेगवेगळ्या भागात 3 बंद फ्लॅट फोडत साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. दत्तवाडी, कोंढवा व चतुःश्रुगी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.

पर्वतीदर्शन येथील फुले व्हिला हौसिंग सोसायटी येथे राहणारे विक्रांत सदाशिव लाटे (वय 48) यांच्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. फिर्यादी व त्यांची पत्नी हे शुक्रवारी दुपारी क्लिनिकमध्ये गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुमच्या कपाटात असलेले 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. तक्ररादार हे घरी आल्यानंतर त्यांना प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास

दत्तवाडी पोलिस करत आहेत.

तर सकाळनगर येथील बिल्डींग क्रमांक १८ मध्ये राहणारे कौस्तूभ दास (वय 37) यांचा बंद फ्लॅट फोडून रोकड व दागिने असा तीन लाख 40 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ डिसेंबर रोजी तक्रारदार हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सोन्याचे दागिने व कॅमेरा असा 3 लाख 40 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी हे 19 डिसेंबर रोजी घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक महेश भोसले करत आहेत.

तिसरी घटना येवलेवाडी घडली असून, गोवींद क्षीरसागर (वय 26) यांचे मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी विविध कंपनीचे पाच मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.