Pune News | केमिकलमुळे इंद्रायणीचे पाणी दुषित, पाण्यावर सर्वत्र फेसच फेस, पावित्र्य धोक्यात

पुणे : Pune News | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या (Saint Dnyaneshwar Mauli) आळंदीत इंद्रायणी नदीला (Indrayani River Alandi ) अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. राज्यभरातून येणारे लाखो भाविक आणि वारकरी मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने इंद्रायणी नदीचे पवित्र पाणी प्राशन करतात. मात्र इंद्रायणी नदी पात्रात केमिकल (Chemical Water) सोडले जात असल्याने आता पाणी दुषित झाले आहे. नदीच्या पाण्यावर सर्वत्र विषयुक्त फेसच फेस दिसत आहे. एकुणच इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. (Pune News)

गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणी नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दुषित झाले आहे. आता इंद्रायणीच्या संपूर्ण पात्रात केमिकल युक्त फेस पसरलेला आहे. यामुळे आजूबाजूच्या लोकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे.

प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या इंद्रायणीला वाचवण्याचे आश्वासन अनेक लोकप्रतिनिधींनी अनेकदा दिले.
पाहणी दौरे झाले. पण इंद्रायणीचे प्रदुषण कमी झालेले नाही, उलट ते वाढत चालले आहे. या केमिकलयुक्त पाण्यामुळे
शेती आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही प्रशासन काहीही करत नसल्याचे चित्र आहे. (Pune News)

औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना राजकीय पाठबळ असल्याने खुलेआम इंद्रायणी नदीत केमिकल सोडले जात आहे.
या पाण्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता आहे. या समस्येसाठी इंद्रायणी सेवा फाऊंडेशन सातत्याने आवाज उठवत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP – MNS | ‘…तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’, दिवाळी कार्यक्रमावरून भाजप-मनसेत जुंपली!

The Poona Merchants Chambers | खाद्यान्न एफएसएसएआय नविन व नुतणीकरण परवान्यांची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी; दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या पाठपुराव्याला यश

Sonam Kapoor Latest Photo | सोनम कपूरने शेअर केला मूलाचा आणि पतीचा गोंडस फोटो म्हणली, हेच माझं धन आहे..