Pune News | पुण्यातील ‘त्या’ 12 श्वानांच्या मालकांना कोर्टाचा दणका, मनेका गांधींनी उघडकीस आणला होता क्रुरतेचा प्रकार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   पुण्यात श्वानांचा अनधिकृत सांभाळ तसेच त्यांचे ब्रिडिंग (प्रजनन) करत त्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याचा प्रकार मनेका गांधी (maneka gandhi) यांनी उघडकीस आणला (Pune News) आहे. न्यायालयात पोहचलेल्या या वादानंतर न्यायालयाने मूळ मालकाला या श्वानांचा ताबा देण्यास स्पष्ट नकार देत जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे (District Animal Husbandry Department) देण्याचे आदेश दिले (Pune News) आहेत. दरम्यान, घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. श्वानांना गंभीर इजा झाली आहे.

न्यायालयात पिपल फॉर अँनिमल्स (people for animals india) याच्यावतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे (advocate vijaysingh thombre) यांनी बाजू मांडली आहे.
पिपल फॉर अँनिमल्सच्या मेनका गांधी (people for animals maneka gandhi) यांच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा अध्यक्षा पुनीत खन्ना व विनिता टंडन यांनी पोलिसांच्या मदतीने 12 श्वानांची लोणीकंंद (Lonikand) परिसरातून सुटका केली होती.

याबाबत माहिती अशी की, पिपल फॉर अँनिमल्सच्या मेनका गांधी (people for animals maneka gandhi) यांच्याकडून मे महिन्यात पुनीत खन्ना यांना या श्वानांनाच्या क्रूरतेबाबत तक्रार मिळाली होती. त्याबाबत खन्ना व टंडन यांनी लोणीकंद पोलिसांच्या (Lonikand police) मदतीने लोणीकंद येथील एका व्यक्तीच्या घरातून हे 12 श्वान जप्त केले होते.
यावेळी श्वान खूपच गंभीररित्या आढळून आले होते.
त्यानंतर या श्वानांचा ताबा घेत त्यांनी हे श्वान जिल्हा पशुसंवर्धनकडे दिले होते.
दरम्यान, या श्वानांचे मेडिकल करण्यात आले.
त्यात या श्वानांच्या त्वचेला इजा झाल्याचे दिसून आले.
तर त्यांचा व्यवस्थित सांभाळ न करता क्रूरतेने सांभाळ केला जात असल्याचे दिसून आले.

हे प्रकरण सुरू असतानाच श्वानांच्या मालकानी श्वानांचा ताबा मिळावा, असा अर्ज न्यायालयात केला होता. याबाबत न्यायालयात सुनावणी झाली आहे.
न्यायालयाने मूळ मालकाला श्वानांचा ताबा देण्यास नकार दिला.
तर, संबंधित व्यक्तीला या श्वानाचा सांभाळ व वाहतूक खर्च प्रति दिन 260 प्रमाणे एक वर्षाचा द्यावा, असे आदेश दिले आहेत.
तसेच, हा खर्च व श्वान पुढील 7 दिवसात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती यांच्याकडे देण्याचा ताबा द्यावे असे म्हणले आहे.

याबाबत गेले एक महिना पिपल फॉर अँनिमल्सच्या पुनीता खन्ना व विनीता टंडन (Puneeta Khanna and Vinita Tandon of People for Animals) व अ‍ॅड ठोंबरे (advocate vijay thombre) झगडत आहेत.
खन्ना यांनी सांगितले की, श्वानांचे ब्रिडिंग (प्रजनन) करण्यासाठी शासनांची परवानगी लागते. तसा परवाना मिळतो. मात्र या व्यक्तीकडे परवाना नाही.
तर सांभाळ करण्यासाठी देखील परवानगी लागते. ती देखील नाही.
अश्या पद्धतीने श्वानांची क्रूरता उघडकीस आणल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

Web Title : Pune News | Court slaps 12 dog owners in Pune, people for animals Maneka Gandhi exposes type of cruelty

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Gold Price Today | गोल्डच्या दरात आजसुद्धा नोंदली गेली तेजी, चांदीची चमक परतली, पहा आजचे बंद भाव

LPG Price | दिलासादायक ! आता स्वस्तात होईल स्वयंपाक, गॅसच्या वाढत्या महागाईचे नो-टेन्शन, जाणून घ्या

Konkan Railway | कोकण रेल्वेचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’