Pune News | निलिमा चव्हाणचा घातपातच, पुण्यातील नाभिक समाजाची चौकशीची मागणी

संत सेना युवा प्रतिष्ठानकडून जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | निलिमा चव्हाण हिचा घातपातच झाला असल्याचा दाट संशय असून या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी करावी, या मागणीसाठी पुणे शहर व जिल्ह्यातील नाभिक समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh) व पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांना निवेदन दिले आहे. तसेच आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी संत सेना युवा प्रतिष्ठानने (Sant Sena Youth Foundation) केली आहे. (Nilima Chavan Case)

निलीमा सुधाकर चव्हाण ही स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) शाखेच्या दापोली येथे कार्यरत होती. गेल्या महिन्याच्या शनिवारी 29 जुलै 2023 ला निलीमा चव्हाण दापोलीहून बँकेच्या शाखेतून घरी ओमळी चिपळुण येथे येण्यास निघाली होती. या प्रवासा दरम्यान ती वाटेतच बेपत्ता झाली होती. या दरम्यान साधारण दोन दिवस तर तिचा पत्ताचा लागला नव्हता आणि 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दाभोळ खाडी येथे तिचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता.

डोक्यावरील संपूर्ण केस नष्ट करण्यात आले होते, तिच्या भुवय्या देखील काढण्यात आल्या होत्या. अत्यंत वाईट अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीने हे कृत्य केले आहे. त्याचसोबत नीलिमावर अत्याचार देखील झाल्याचाही संशय आहे. नीलिमावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

या दरम्यान झालेल्या सर्व घटना किंवा नोंदी लक्षात घेता निलीमा चव्हाण हिचा घातपात झाल्याची शक्यता आहे.
या प्रकरणात कसून चौकशी करुन आरोपीचा शोध घ्यावा व त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी
नाभिक समाजाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | डाबर ओडोमोसने डेंग्यू मुक्त भारत मोहीम सुरू केली; डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्याबाबत जनजागृती

ACB Trap News | 15 हजार रूपयाची लाच घेताना कार्यालयीन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात