Pune News | दफनभूमीचे आरक्षण बदलल्याने मुस्लिम समाजाचे पुणे महापालिकेत आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे शहर दफनभूमी कृती समितीच्या (Pune City Burial Ground Action Committee) वतीने पुणे महानगरपालिका (PMC) येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन (Agitation) करण्यात आले. अनेक वर्षांपासून सॅलिसबरी पार्क (Salisbury Park) येथे असलेल्या मुस्लीम समाजाच्या दफनभूमीचे आरक्षण (Reservation) कायम ठेवावे यासाठी मुस्लीम संघटनांनी पालिकेसमोर आंदोलन केले. (Pune News)

प्लॉट नंबर 441 सॅलिसबरी पार्क या ठिकाणी गेली अनेक वर्ष दफनभूमीचे आरक्षण आहे, सदर आरक्षण बदलून एका उद्योगपतीला सदर भूखंड देण्याचा महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांचा मानस असल्याचा संशय आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या (Muslim Community) वतीने आंदोलन करून सदर जागेवर दफनभूमी आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट – NCP Ajit Pawar Group), काँग्रेस (Congress), शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे (Shiv Sena UBT), एमआयएम गट (MIM group), वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi), जमिया ए उलमा हिंदी (Jamia e Ulma Hindi) व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. (Pune News)

याप्रसंगी कृती समितीचे जमीर मोमीन, अहमद सय्यद, समीर शेख, फयाज खान,
फयाज शेख, जावेद खान, मो.जकाती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar),
कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh),
काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Congress City President Arvind Shinde) व विविध पक्षाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Health Tips | पावसाळ्यात हंगामी आजारांपासून रहा सावध, अशी घ्या आरोग्याची काळजी

Maharashtra Assembly Session 2023 | पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले; काँग्रेसचा घणाघात