Pune News | पुणे रेल्वे स्थानकात ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’चे १२० सीसी टीव्ही कॅमेरे, आरोपी ओळखून देणार माहिती, जाणून घ्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | मध्य रेल्वे निर्भया फंडातून (Central Railway Nirbhaya Fund) ११७ रेल्वे स्थानकांवर आता ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’चे (Face Recognition System) साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवणार आहे. या अंतर्गत पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. त्यामुळे पुणे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा जागता पाहरा राहणा आहे. हे कॅमेरे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे चेहरे ओळखतील. (Pune News)

मध्य रेल्वेचे महत्वाचे स्टेशन असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनमधून दिवसाला १२०पेक्षा जास्त गाड्या ये-जा करत असतात. त्यामधून सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सातत्याने चोरी, लुटमारीसह इतर गंभीर गुन्हे घडत असतात.

पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या सुरक्षेसाठी ६० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात होता. पुणे रेल्वे स्थानका असलेल्या ६० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची कालमर्यादा संपली असून येथे आणखी कॅमेऱ्यांची आवश्यकता होती.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे निर्भया फंडातून सर्व स्टेशनवर अत्याधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवर ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. जुने ६० सीसीटीव्ही कॅमेरे बदलून त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसवले जातील. अशा पद्धतीने १२० सीसीटीव्ही कॅमेरे मार्च २०२४ अखेरपर्यंत बसवले जातील.

या नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये फेस रेकग्निशन सिस्टिम असणार आहे. या कॅमेऱ्यांद्वारे जमा केलेला डेटा आयपी नेटवर्कद्वारे मॉनिटरिंग स्टेशनवर पाठवला जातो. या कॅमेऱ्याच्या डेटाबेसमध्ये ज्याचा चेहरा संग्रहित आहे, ती व्यक्ती ओळखता येईल. (Pune News)

रेकॉर्डवरील गुन्हेगाराने स्थानकात प्रवेश केल्यास प्रशासनाला ताबडतोब सूचना मिळेल. हे कॅमेरे चेहऱ्याचे विविध भाग जसे की डोळ्यातील पडदा किंवा कपाळ ओळखू शकतात. गोळा केलेला डेटा ३० दिवसांसाठी संग्रहित राहतो.

पुणे विभागातील २० रेल्वे स्टेशनवर ७३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
त्यापैकी पुणे व मिरज येथील कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे.
सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ९५ पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.

पुणे विभागातील २० रेल्वे स्टेशनवर ७३३ सीसीटीव्ही कॅमेरे

  • चिंचवड स्टेशनवर ४५
  • शिवाजीनगर २६
  • तळेगाव ४४
  • सातारा ४५
  • सांगली ४४
  • कराड ४४
  • कोल्हापूर ४०

डॉ. रामदास भिसे यांनी म्हटले की, सर्व कॅमेरे आयपी टेक्नॉलॉजीचे असल्याने प्रवाशांची सुरक्षा वाढविण्याच्या दिशेने
एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे.

मध्य रेल्वे एकुण ३,६५२ सीसी टीव्ही कॅमेरे बसवणार आहे. यापैकी पुणे रेल्वे विभागात ७३३ कॅमेरे बसवले जातील.
तर पुणे रेल्वे स्टेशनवर १२० कॅमेरे बसवले जाणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून उकळली 8 लाखांची खंडणी, पुण्यातील पती-पत्नीसह तिघांवर FIR

Lalit Patil Drugs Case | ससून ड्रग्ज प्रकरण : पुणे पोलीस ललित पाटीलवर मोक्का अतंर्गत कारवाई करण्याच्या तयारी