Pune News | खाटू श्यामच्या रंगात तल्लीन झालेले पुणेकर ! कन्हैया मित्तलच्या सुरेल भक्ती सरात नाहले 5000 लोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | आजच्या युगात एकमेकांना भेटायलाही वेळ मिळत नाही. मंदिरात जाणे किंवा भजन किंवा धार्मिक समारंभाला जाणे विसरून जातो. आजच्या तरुण पिढीकडून त्यावर आशा ठेवणे विसरून जा. मात्र ब्रदरहुड फाऊंडेशनने याला खोटे साबित केले आहे. त्यांनी लोकांना केवळ श्रद्धेच्या नदीत स्नान करायला लावले नाही तर पुण्यातच खाटू श्याम बाबा चे दर्शन घडवले.(Pune News)

निमित्त होते एक शाम सांवरिया के नाम. ज्याचे आयोजन गंगाधामच्या वर्धमान कल्चरल लॉनमध्ये करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रसिद्ध भजन गायक कन्हैया मित्तल आणि उदयोन्मुख कलाकार गौरव पारीक यांनी त्यांच्या सुरेल आवाजात भजने गायली. हे ऐकण्यासाठी सुमारे 5 हजार लोक जमले होते. भगवान खाटू श्यामच्या भक्तीमध्ये, कन्हैयाने अनेक लोकप्रिय भजने गायली, जी ऐकून लोक केवळ मंत्रमुग्ध झाले नाहीत तर जोमाने नाचले सुध्दा. संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात रंगून गेला होता.

यावेळी मंचावर खाटू श्याम बाबा यांची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली. त्यांना छप्पन नैवेद्य अर्पण केले गेले.
लोकांनी खाटू श्यामचे भक्तीभावे दर्शन घेतले. या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे 5 हजार लोक जमले होते.
ज्यामध्ये अग्रवाल समाजाचे लोक जास्त होते. लहान मुले असोत, वृद्ध असोत, महिला असोत की तरुण असोत,
सर्व सहभागी झाले होते. कन्हैया मित्तलने असे भव्य वातावरण निर्माण केले की लोक भक्तीत तल्लीन झाले होते.
खाटूू श्यामच्या भक्तीत तो मग्न होताच त्याचे भान हरपले. प्रत्येकजण त्यांच्या तालावर नाचताना दिसत होते. सोहळ्यानंतर लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

ब्रदरहुड फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक अध्यक्ष पवन जैन, सचिव रविकिरण अग्रवाल,
सहसचिव नरेंद्र गोयल, खजिनदार संजय अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश गोयल,
कोअर कमिटी सदस्य ईश्‍वरचंद गोयल, समन्वयक विकास गुप्ता, पवन बन्सल, संजय अग्रवाल (प्रिन्स), योगेश अग्रवाल,
दीपक बन्सल, संजय कुमार अग्रवाल, पवन चमाडिया,बलबीर अग्रवाल, नरेंद्र मित्तल, राजकुमार जिंदल,
संजय एल. अग्रवाल,तसेच अग्रवाल समाजातील तरुणांनी यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

चंदीगडचे प्रसिद्ध भजनसम्राट कन्हैया मित्तल आणि गौरव पारीक यांनी हारे-हारे-हारे, हारे के सहारे…, देना हो तो दिजीए
जनम जनम का साथ…, माँ मुझे तेरी जरूरत है.., मेरी झोली भर दे बाबा.., खाटू वाले श्याम रे हम हैं तेरे बाबरे,
बचपन से आऊं खाटू भूल नहीं जाना रे…, मेरे श्याम का मुखड़ा, लगे चांद का टुकड़ा, मुझ पर कृपा करे श्याम बाबा..,
हर घर में एकही नाम गुजेगा जय श्रीराम जय श्रीराम …, रामजी की निकली सवारी…, सांवरिया लो संभाल कहीं ना खो जाऊं,
कुछ ऐसा कर कमाल कि तेरा हो जाऊं.., आदी एकापाठोपाठ एक भजन गाऊन श्रोत्यांना खिळवून ठेवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | पुणे : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करुन महिलेचा विनयभंग, विनयभंग करणाऱ्या पतीच्या मित्रावर FIR

Sangola Crime News | सांगोल्यातील महूदमध्ये पहाटे गुढ स्फोट; एकाचा मृत्यु, घातपाताचा संशय

Pune Hadapsar Crime | तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक, हडपसर भागातील प्रकार