Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचे निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | पुणे महानगरपालिका मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांना धमकी देणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत शिवाजीनगर पोलीस स्स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांना रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे व संघटनेच्या कार्यक्कर्त्यानी निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Pune News)

निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की, पुण्येश्वर मंदिराच्या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेटसमोर काही संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात आमदार नितेश राणे, आमदार महेश लांडगे, मिलिंद एकबोटे, धीरज घाटे आदी नेते उपस्थित होते. वरील निषेधादरम्यान चिथावणीखोर भाषणे करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आमदार नितेश राणे यांनी पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलले आहे. त्यांच्या भाषणात त्याचा गोषवारा देण्यात आला आहे. (Pune News)

या भाषणाची व्हिडीओ क्लीप बंदोबस्तात असणाऱ्या पोलीसांकडे व माध्यमांकडे उपलब्ध आहे.
सदर प्रकरणी पुण्यश्वर मंदिराचा प्रश्न हा न्याय प्रविष्ठ असून सदर ठिकाणचे बांधकाम पाडण्याची नियमबाहय
मागणी जाणिवपुर्वक काही संघटनांकडून केली जात आहे. सदरचे बांधकाम पाडता येणार नाही असे
पुणे महानगरपालिकेकडून स्पष्टपणाने सांगुणही हे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते दोन समाजात तेढ निर्माण होईल
असे कृत्य करत आहेत. ते बांधकाम पाडले जात नाही याचा राग मनात ठेवुन आमदार नितेश राणे यांनी
पुणे महानगरपालिकेचे मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना व्यक्तीगत दोष देत त्यांना मारण्याची धमकी देवुन
त्यांचा अवमान केला आहे. या घटनेचा आम्ही या निवेदनाद्वारे जाहिर निषेध करत असून आमदार नितेश राणे
यांच्या कायदेशिर पोलीसांनी कारवाई करून अटक करावी. या पुढे नितेश राणे यांना पुणे शहरामध्ये कोणत्याही
कार्यक्रमात भाषण करण्यास परवानगी देवु नये. तसेच प्रशांत वाघमारे यांना सामाजिक संघटनांकडून धोका निर्माण
होवु शकतो म्हणून तात्काळ पोलीस सुरक्षा देण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे ,पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली भोसले, विशाल घाडगे,
अनिल अवसरमल ,सविता गायकवाड यांच्यासह रिपब्लिकन जनशक्तीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ