Pune News | सावधान ! पुण्यात दररोज वाढतयं डेंग्यूचं प्रमाण; रुग्णांमध्ये वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Pune News | शहरामध्ये नुकतीच पावसाला (Pune Monsoon) सुरुवात झाली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचत असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी शहरातील डेंग्यूची रुग्णसंख्या (Dengue Patients) देखील दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यामध्ये (Pune News) डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत (Dengue Cases In Pune) असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची (PMC Health Department) चिंता वाढली आहे. शहरामध्ये फक्त या महिन्यामध्ये 161 संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील 12 जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. वर्षभरात आतापर्यंत डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या 633 पेक्षा अधिक झाली आहे. ही बाब चिंतादायक असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सूचित करत आहे.

पुणे शहरामध्ये नागरिकांना आरोग्याची काळजी व स्वच्छतेची काळजी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण पालिकेच्या हद्दीमध्ये या जुलै महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्ण संख्येमध्ये (Pune Dengue Patients) लक्षणीय वाढ होत आहे. पुणे महापालिकेचे (Pune PMC) सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर (Dr. Suryakant Devkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात संशयित रुग्णांची संख्या 161 वर पोहोचली असून, त्यातील 12 जणांना डेंग्यू झाला असल्याचे निदान झाले आहे. डेंग्यूमुळे एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू (Dengue Patient Death) झाला असून ह्या वर्षातील पहिला डेंग्यू रुग्णाचा मृत्यू आहे. तसेच डासांमुळे होणाऱ्या आणखी एक आजार चिकनगुनिया (Chikungunya) याचे आत्तापर्यंत 3 रुग्ण आढळले आहेत.

शहरातील ससून रुग्णालयामध्ये (Sassoon General Hospital Pune) डेंग्यू आजाराने संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. साधारणपणे दररोज दोन ते तीन लोक संशयित रुग्ण म्हणून दाखल होत आहेत. ससून रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे (Dr. Rohidas Borse) यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, संशयित रुग्णांची एनएस-1 (NS-1) आणि आयजीएम चाचणी (IGM Test) केली जात आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (National Institute of Virology) आरटीपीसीआर चाचणीसाठी (RTPCR Test) नमुने पाठवले जात आहे. या जुलै महिन्यात आतापर्यंत 91 नमुने पाठविण्यात आले असून, त्यातील 7 ते 8 जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. शहरातील वाढता प्रादुर्भाव (Pune Health) लक्षात घेत पालिका देखील योग्य पाऊले उचलत आहे. नागरिकांना देखील स्वच्छतेचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिके तर्फे शहरामध्ये (Pune News) डेंग्यू पसणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
पालिकेने काही लोकांवर दंडात्मक कारवाई करत नोटीस देखील देण्यात आली आहे.
डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी या जुलै महिन्यामध्ये 520 निवासी आणि व्यावसायिकांना नोटीस देण्यात आली आहे.
त्यांच्याकडून 46 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वर्षभरात अशा प्रकारच्या 1 हजार 13 नोटीस नागरिकांना बजावण्यात आल्या असून यामधून
आत्तापर्यंत एकूण 1 लाख 39 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Caste Verification Certificate | जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे होणार सहज; आठवडे बाजारात होणार शिबिरे

Pune Police News | भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे कोंढवा पोलिसांचे आवाहन