Caste Verification Certificate | जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे होणार सहज; आठवडे बाजारात होणार शिबिरे

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Caste Verification Certificate | मागासवर्गीय समाजासाठी महत्त्वपूर्ण असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र यापुढे जलद गतीने मिळण्यास मदत होणार आहे. या जात पडताळणी प्रमाणपत्राशी (Caste Verification Certificate) निगडित शिबिरे यापुढे राज्यातील विविध आठव़डे बाजारांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (BARTI) हा स्तुत्य उपक्रम सुरु करण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राज्यातील मागासवर्गीय नागरिकांसाठी हे जात पडताळणी प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना शिक्षण (Education), नोकरी (Employment), निवडणुका (Elections) यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देणे गरजेचे असते. मात्र हे जात पडताळणी प्रमाणपत्र सहज मिळत नाही. त्यासाठी मोठी प्रोसेस फॉलो करावी लागते. आता मात्र ते मिळवणे या उपक्रमामुळे शक्य होणार आहे. यापुढे राज्यातील गावागावातील आठवडे बाजारामध्ये शिबिरे (Caste Verification Certificate Camps) आयोजित केली जाणार आहेत. ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoria) हे बार्टी संस्थेच्या समाज कल्याण आयुक्त पदाच्या पदी नियुक्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेस (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) भेट देऊन कामकाज आढावा घेतला. त्यांच्या निर्देशानुसार यापुढे जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) जलद गतीने मिळण्यासाठी आठवडे बाजारात शिबिरांचे आयोजन करण्यात येईल व जात पडताळणीची कामे जलद गतीने करण्यात येतील.

यावेळी संस्थेबद्दल देखील ओमप्रकाश बकोरिया यांनी गौरोवद्धार काढले.
ते म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी तसेच कौशल्य विभागामार्फत दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध
करून देण्यात येत आहे. “बार्टी’ संस्थेचे (BARTI Institute) कार्य प्रेरणादायी आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजकल्याण व बार्टी एकत्रित काम करतील.
असे मत समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मांडले.

या भेटीवेळी बार्टीचे महासंचालक सुनिल वारे (Dr. Sunil Vare), विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण
(Satyendranath Chavan), स्नेहल भोसले, अनिल कारंडे, आरती भोसले, रवींद्र कदम, वृषाली शिंदे यांच्यासह
बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Maharashtra Rain Update | राज्यात आजही जोरदार पावसाचा इशारा; पुण्यासह सातारा, कोकण, रायगड आणि रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’

Supreme Court | ”मतदारांना उमेदवाराची माहिती जाणून घेण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय

Google Search Enhances Women’s Sports Coverage for 2023 FIFA Women’s World Cup