Pune News : क्रीडा विद्यापीठासाठी लागणाऱ्या सुविधा बालेवाडीत, त्यामुळे माझी पहली पसंती पुण्याला : मंत्री सुनील केदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यात घेण्यावरून अनेक राजकीय आरोप झाले. सर्वकाही पुण्यालाच का ? अशी विचारणा झाली. परंतू पुण्यात क्रीडा क्षेत्रासाठी असणाऱ्या पायाभुत सुविधा, पोषक वातावरण आणि क्रीडा संस्कृती रूजली आहे. येथील सोयीसुविधांचा वापर करून लगेचच क्रीडा विद्यापीठ सुरू करता येईल, असा विचार करून निर्णय घेतला. त्यामुळे वेळ आणि खर्चातही बचत होणार आहे, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन होत आहे. याविषयी सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त सुहास दिवसे, आमदार अशोक पवार, शिक्षणतज्ञ डॉ. जवाहर सुरीशेट्टी आदी उपस्थित होते.

केदार म्हणाले, इतर ठिकाणी विद्यापीठ सुरू करण्यास अडचण नव्हती. परंतू विद्यापीठासाठी लागणाऱ्या सुविधा नव्याने निर्माण कराव्या लागल्या असत्या. विधीमंडळात क्रीडा विद्यापीठाचे बिल एकमताने मंजूर झाले. त्यामुळे विद्यापीठासाठी निधी मिळविताना अडचणी येणार नाहीत. विद्यापीठाचा निर्णय झाल्यानंतर जलदगतीने कामे करण्यास सुरवात केली. बालेवाडी येथील सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने सुरू असते. विद्यापीठाला विस्तीर्ण स्वरूप येण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत काही अभ्यासक्रम आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार असून यासाठी २०० कोटी व विद्यापीठ कार्पेस फंडसाठी २०० कोटी याप्रमाणे एकूण ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मागदर्शक सूचना आणि निकषांच्या आधारे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक आहे. ऑलिंपिकमधील पदकांची संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाचे मोठे योगदान राहणार आहे. २०२४ आणि २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिपिंक पदकाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन विद्यापीठाचे कार्य सुरू राहील. या विद्यापीठात प्रवेशासाठी मागासवर्गीय कुटुंबातील मुलींना प्राधान्याये संधी दिली जाणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

बालेवाडी येथे १५४ एकर जागेमध्ये असलेल्या सोयीसुविधांचा वापर करून अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. विद्यापीठासाठी बालेवाडीतील जागा अपुरी असली तरी हा प्रश्न लवकर सोडवला जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना शुल्कामध्ये सवलत देखील दिली जाणार आहे. सरकारी विद्यापीठ असल्याने सर्वसामान्यांना परवडणारे शुल्क आकारण्यात येईल, असेही केदार यांनी