Pune News | पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये युस्टाच्या नवीन दालनाचा दमदार शुभारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | रिलायन्स रिटेल अंतर्गत तरुणाईचा फॅशन ब्रँड असलेल्या यूस्टाचे पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये दुसऱ्या दालनाचा भव्य शुभारंभ झाला. या नवीन भव्य दालनाच्या उद्घाटनावेळी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. (Yousta Expands Presence in Pune with Grand Opening at Phoenix Marketcity)

श्रद्धा कपूर, तिच्या अभिनयातील विशेष शैलीसाठी ओळखली जाते, तीने यूस्टाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सवलतींची प्रशंसा आणि कौतुक केले. तिने संपूर्ण दालनाचा फेरफटका मारत दालनातील विविध फॅशनेबल वस्तू आणि सेवांची श्रेणींची माहिती घेत उपलब्ध संग्रहाबद्दल तिची आवड व्यक्त केली. विशेष म्हणजे, कपूर यांनी यूस्टा स्टोअर्समधील तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण वापराचे कौतुक केले, की सेल्फ-चेकआउट बूथ आणि क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे माहितीची सुलभता तिचा खरेदीचा अनुभव खूपच सुखद होता. यातून यूस्टाची टेक-सॅव्ही अर्थात तंत्रज्ञान आधारित खरेदी वातावरणाचा अनुभव मिळतो.(Pune News)

फिनिक्स मार्केटसिटी येथील हे नवीन स्टोअर यूस्टाचा पुण्यातील दुसरा उपक्रम म्हणून ओळखले जातो, जो पुण्यातील एरोमॉल येथील विद्यमान यूस्टा दालनाशी पूरक आहे. भारतातील विविध शहरांमध्ये मिळालेल्या उत्तुंग यशानंतर, यूस्टा पुण्यातील फॅशन प्रेमींसाठी ट्रेंडी आणि परवडणारी फॅशन ऑफर आणण्यास नाशिक उत्सुक आहे. डायनॅमिक आणि परवडणाऱ्या म्हणजेच बजेट-फ्रेंडली कलेक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडने २०२३ मध्ये सुरुवातीपासूनच तरुण ग्राहकांची मने जिंकली आहेत.

फॅशन सर्वांसाठी सुलभ बनवण्याच्या उद्देशाने, यूस्टाकडे स्टायलिश कपड्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे, ज्यांची किंमत ४९९ रुपयांपेक्षा कमी आहे. ९९९ पेक्षा जास्त नाही. फिनिक्स मार्केटसिटीमधील नवीन दालनामध्ये यूस्टाच्या
ब्रँडेड “स्टारिंग नाऊ” कलेक्शनद्वारे फॅशनेबल जोडे आणि विकाली फॅशन ड्रॉप्सची विस्तृत श्रेणी प्रदान करते.

आधुनिक रिटेल पद्धतींचा अवलंब करून, फिनिक्स मार्केटसिटी येथील यूस्टाचे स्टोअर तंत्रज्ञान-सक्षम खरेदी अनुभव देण्यास सक्षम आहे. ग्राहक टेक टचपॉइंट्सचा आनंद घेऊ शकतात जसे की अखंड माहिती प्रवेशासाठी क्यूआर कोड, जलद व्यवहारांसाठी सेल्फ-चेकआउट काउंटर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी चार्जिंग स्टेशनची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फॅशनबरोबर यूस्टा समुदाय चांगल्या सेवेसे प्रतिबद्ध असून अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
यूस्टाने एका ना-नफा तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या एका संस्थेसोबत भागीदारी केली आहे. सामूहिक कार्यक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींचा प्रचार करण्यासाठी तिचा वापर केला जातो.

पुण्यातील ग्राहक स्टोअरमधील व्हायब्रंट यूस्टा कलेक्शन एक्सप्लोर करू शकतात आणि AJIO/(अजिओ) आणि JioMart (जिओमार्ट) या प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन खरेदीच्या सुविधेचा आनंद घेऊ शकतात.

यूस्टाबद्दल अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी @youstafashion इंस्टाग्रामवर फॉलो करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | पुणे: लाच घेताना ग्रामसेवक पुणे अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune CP Amitesh Kumar | ‘रस्त्यावर महिलांची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळणार’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Video)